महाराष्ट्रराजकीय
रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा…
आमदार व महिला पदाधिकारी कडून जोरदार मागणी करण्यात आली होती

मुंबई : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या Rupali Chakankar यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर आता त्यांनी पक्षीय पदाचाही त्याग केला आहे.
आमदारांच्या वाढत्या दबावामुळे तसेच पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. अशोक खरात यांच्या ‘शिवनिका ट्रस्ट’वर सदस्य असल्यामुळे त्यांच्या चौकशीची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, “माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. मात्र तपास पारदर्शक व्हावा यासाठी मी स्वेच्छेने पदाचा राजीनामा देत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.



