कोकणदेश-विदेशमहाराष्ट्रराजकीय

बाळ मानेंच्या प्रवेशासंदर्भात मुंबईत बैठक

रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने भाजपमध्ये प्रवेश निश्चित

बाळ माने मुंबईतून नितेश राणे यांच्या विमानातून रत्नागिरीत आले. अर्ज मागे घेतला. तसेच त्याच विमानातून राणे यांच्यासह मुंबईत गेले असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बैठक सुरु असल्याचे समजते. त्यामुळे आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळी बाळ माने यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होईल असे सांगण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंत यांना शह देण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तसेच स्वतः नितेश राणे यांनी बाळ माने यांचे मन वळवले. ठाकरे सेनेचे अस्तित्व संपवणे हाही अजेंडा आहे.

दरम्यान, बाळ माने यांचा फॉर्म भरताना सोबत असलेले भास्करराव जाधव यांचा या सर्व राजकीय घडामोडीत काय रोल आहे का? की ते अनभिज्ञ् आहेत याबाबत ठाकरे गट शिवसेनेतून चर्चा होताना दिसते आहे. स्वतः भास्करराव दोन दिवसांपासून मुंबईत आहेत. बाळ मानेही मुंबईतच होते. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात अनेक धक्कादायक घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button