कोकणदेश-विदेशमहाराष्ट्रराजकीय
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद आमदार पदी अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड
महाविकास आघाडीचे उमेदवार बाळा माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद आमदार निवडणूक मध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमधून विधान परिषदेसाठी अनिकेत तटकरे बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते महाविकास आघाडीतर्फे बाळ माने यांना उमेदवारी देण्यात आली होती अनिकेत तटकरे यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली होती परंतु आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती या अंतिम मुदतीपूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे अनेकांना धक्काच बसला आहे या पार्श्वभूमीवर अनिकेत तटकरे हे बिनविरोध कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे विधान परिषदेचे आमदार झाले आहेत


