कोकणदेश-विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

पत्रकार दीपक शिंदे यांच्या गणपती विशेषांकाचे उत्साहात प्रकाशन

जर्नालिस्ट असोचे अध्यक्ष व दैनिक सागरचे पत्रकार श्री. सुनील साळवी यांच्या हस्ते करण्यात आले

चिपळूण : येथील तरुण पत्रकार व ‘मराठी समाचार’ न्यूज चॅनेलचे संपादक श्री. दीपक शिंदे यांच्या गणपती विशेषांकाचे प्रकाशन आज सायंकाळी जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूण या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.*

जर्नालिस्ट असोचे अध्यक्ष व दैनिक सागरचे पत्रकार श्री. सुनील साळवी, कार्याध्यक्ष श्री. सतीश कदम, उपाध्यक्ष राजेंद्रकुमार शिंदे, खजिनदार संतोष पिलके, सदस्य मकरंद भागवत, ललेश कदम,अनिल फाळके यांच्या हस्ते गणपती विशेषांकाचे प्रकाशन झाले. संस्थेचे सचिव असलेले श्री. दीपक शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले.

कोकणातील गणेशोत्सवाची अनोखी परंपरा, मुंबईतील चाकरमानी आणि कोकणातील गणेशोत्सवाचे अतूट नाते, याशिवाय गणपती उत्सवाचे विविध प्रकार आणि संस्कृती यांची सचित्र माहिती गणपती विशेषांकात देण्यात आली आहे. त्यामुळे हा अंक वाचनीय ठरतो.

आमदार शेखर निकम, शिवसेना नेते रवींद्र फाटक, भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, नगरसेवक मनोज शिंदे, मनसे नेते प्रमोद गांधी, विभागीय वनअधिकारी गिरीजा देसाई, कष्टकऱ्यांचे नेते अशोकराव कदम आदींनी पत्रकार श्री. दीपक शिंदे यांच्या विशेषांकाचे कौतुक केले आहे. जर्नालिस्ट असोच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी श्री. शिंदे यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button