गुहागरच्या विकासासाठी पालकमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
मंत्रालयात गुहागरच्या विकासासाठी पालकमंत्र्यांन समवेत बैठक संपन्न

गुहागरसह रत्नागिरी उत्तर जिल्ह्याच्या विकासकामांबाबत मंत्री उदय सामंत यांच्यासोबत सकारात्मक चर्चागुहागर: रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांची मंत्रालयात उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी तसेच गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. निताताई मालप यांनी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान गुहागर नगरपंचायतीअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांबाबत तसेच रत्नागिरी उत्तर जिल्ह्यातील प्रलंबित आणि प्रस्तावित विकास योजनांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या मूलभूत सुविधांसह विकासकामांना गती देण्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी संबंधित विषयांवर सकारात्मक भूमिका घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी अमोल सर, गुहागर तालुकाध्यक्ष अभय भाटकर, गुहागर नगरपंचायत बांधकाम सभापती उमेश भोसले, जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, नगरसेवक संतोष सांगले, नगरसेविका विशाखा सोमण तसेच नगरसेविका वैशाली मावळणकर उपस्थित होत्या.



