कोकणदेश-विदेशमहाराष्ट्रराजकीय

राष्ट्रीवादी काँग्रेस अजित पवार गट राज्यव्यापी दौरा करणार

पक्षसंघटनेची मजबूत बांधणी आणि विस्तृत विस्तारासाठी पक्षाचे सर्वजण एकत्रितपणे राज्यव्यापी दौरा करणार - सुनिल तटकरे

*पक्षसंघटनेची मजबूत बांधणी आणि विस्तृत विस्तारासाठी पक्षाचे सर्वजण एकत्रितपणे राज्यव्यापी दौरा करणार – सुनिल तटकरे

नवी दिल्ली दि.  – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व समज-गैरसमज दूर झाले असून लवकरच पक्षसंघटनेची मजबूत बांधणी आणि विस्तृत विस्तारासाठी पक्षाचे सर्वजण एकत्रितपणे राज्यव्यापी दौरा करणार आहोत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज दिल्ली येथील पत्रकार परिषदेत दिली.पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसंदर्भात निवडणूक आयोगाला जे काही सुधारित पत्र द्यायचे आहे, ते येत्या काही दिवसात दिले जाईल. त्यासाठी पक्षातंर्गत बैठकीत सर्व नेत्यांची सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाल्याचेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.विलीनीकरणाबाबत शरद पवारसाहेबांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे त्या विषयात आता काहीही शिल्लक राहिलेले नाही. असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या विचारांवर चालणारा पक्ष असून आम्ही सर्वजण एकत्रितपणे चर्चा करतो. पक्षातील सर्व निर्णय एकमताने घेतले जातात. आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे. अशी स्पष्ट भूमिकाही सुनिल तटकरे यांनी मांडली.

  1. राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये प्रमुख घटक पक्ष असून, भाजपाच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात काम करत आहोत. ही भूमिका कायम ठेवूनच पुढील काळात विकासाभिमुख कामांना अधिक गती देणार आहोत असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button