कोकणमहाराष्ट्रराजकीय

चिपळूण खेर्डीत राजकीय भूकंप… जम्बो पक्षप्रवेश

कोकणात उद्धव ठाकरे गटांना मोठा धक्का माजी उपसरपंच विजय शिर्के युवा सेना तालुका अधिकारी उमेश खताते यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

चिपळूण: कोकणातील राजकारणात मोठी उलथापालथ घडवत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते, खेर्डी ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय शिर्के आणि महिला उपतालुका अधिकारी सौ.दीप्ती सावंत देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

या भव्य कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांनीही पक्षप्रवेश करत शिंदे गटाला मोठी ताकद दिली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोकणाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा ठाम शब्द दिला. “शिवसेना कधीही विकासाच्या बाबतीत मागे पडणार नाही. कार्यकर्त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक प्राधान्य द्यावे,” असा सल्लाही त्यांनी दिला.

दरम्यान, उद्योगमंत्री रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली कोकणात मोठ्या प्रमाणावर राजकीय परिवर्तनाची सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा ओघ शिंदे सेनेकडे वळत असून, कोकणात विकासाच्या मुद्द्यावर जनतेचा कल बदलताना दिसत आहे.

या कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत, कॅबिनेट मंत्री भरत गोगावले, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार राजन साळवी यांच्यासह अनेक मान्यवर नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोकणातील बदलत्या राजकारणात हा पक्षप्रवेश निर्णायक ठरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button