गुहागर चिपळूण मार्गावर वातानुकूलित ई बसेस धावणार…
आ.भास्करराव जाधव यांच्या पत्रावर मंत्री प्रताप सरनाईक यांचे आश्वासन...

आमदार श्री. जाधव यांच्यावतीने ना. सरनाईक यांचे चिपळूण येथे स्वागत
राज्याचे परिवहन मंत्री ना. श्री प्रतापजी सरनाईक हे आज कोकण दौऱ्यावर असताना चिपळूण येथे बसस्थानकाच्या पाहणीसाठी आले होते. त्यावेळी शिवसेना नेते, आमदार श्री. भास्करराव जाधव यांच्यावतीने त्यांचे जवळचे सहकारी नगरसेवक श्री. फैसल कास्कर, श्री. बाळा आंबुर्ले, श्री. अजय भालेकर, श्री. संतोष तांदळे यांनी त्यांचे स्वागत केले. यानिमित्ताने आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी चिपळूण गुहागर – असगोली मार्गावर ई – बस सेवा सुरू कराव्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या शिवशाही बसेस नादुरुस्त असल्याने जिल्ह्यासाठी शिवाई अथवा शिवनेरी या वातानुकूलित बसेस मिळाव्यात या मागण्यां संदर्भात पाठवलेल्या निवेदनाची ना. श्री. सरनाईक यांनी आवर्जून दखल घेतली आणि दोन्ही मागण्याबाबत तात्काळ निर्णय करू, असे आश्वासन दिले.



