कोकण महायुतीचे शक्ती प्रदर्शन अनिकेत तटकरे यांचा अर्ज दाखल
कोकण विधान परिषद रणधुमाळीला सुरुवात

रत्नागिरी विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार संघासाठी चे महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिकेत तटकरे यांनी एक जून रोजी रत्नागिरीत प्रचंड जनसमुदायाच्या आणि दिग्गज नेत्यांच्या साक्षीने प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांच्याकडे सादर केला आहे
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी रत्नागिरीतील हॉटेल विवेक येथे महायुतीच्या मतदारांचा मेळावा झाला या मेळाव्यातील नेत्यांची अभेद एकजूट आणि मतदारांचा अर्थांग उत्साह पाहता विरोधकांची अस्तित्व शोधण्यासाठी आता दुर्बिणीचे घ्यावी लागेल असा थेट इशारा या व्यासपीठावरून देण्यात आला या ऐतिहासिक सोहळ्याला रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सभापती नगरपरिषद व नगरपालिकेचे नगराध्यक्ष नगरसेवक आणि सदस्य प्रचंड संख्येने उपस्थित होते
यावेळी महायुतीचे सर्वच प्रमुख शिलेदार एकाच व्यासपीठावर अवतरले होते व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे उद्योग मंत्री उदय सामंत मंत्री नितेश राणे मंत्री अतिथी तटकरे व आमदार दीपक केसरकर आमदार निरंजन डावखरे आमदार प्रमोद जठार आमदार शेखर निकम आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेंद्र थोरवे रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह माहितीचे प्रमुख पदाधिके व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या धडाकेबाज शैलीत बोलताना नामदार नितेश राणे आणि विरोधकांची खरापुस समाचार घेतला..


