कोकणदेश-विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

चिपळूण कामथे शासकीय रुग्णालयातील महिला डॉ लाच घेताना ACBच्या जाळ्यात

4,500 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक

चिपळूण : तालुक्यातील कामथे येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 4,500 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

एका रुग्णाला विशिष्ट प्रकारच्या औषधांच्या गोळ्या देण्यासाठी डॉ. मदार यांनी 4,500 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACB ने सापळा रचला.

*सायंकाळी 7 ते 7.30 वाजता कारवाई*
मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी 7 ते 7.30 च्या दरम्यान डॉ. कांचन मदार या तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारत असतानाच ACB च्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

या घटनेनंतर संबंधित डॉक्टरांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाच मागण्यामागील नेमके कारण आणि या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास ACB करीत आहे.

सरकारी रुग्णालयातील डॉक्टरच लाच घेताना पकडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा अधिकृत तपशील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button